SHARE

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार असून हा कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

दिवस-रात्र कसोटी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळानं याबाबत होकार दर्शवला असून, भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमींना लुटता येणार आहे.

चांगली संकल्पना

२२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान हा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. 'दिवस-रात्र कसोटी ही खूपच चांगली संकल्पना आहे. कसोटी क्रिकेटला पाठिंबा देणं आणि प्रेरणा मिळणं आवश्यक आहे. मी आणि माझे सहकारी यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल विराट आणि सर्व क्रिकेटपटूंचंही आभार', असं गांगुलीनं म्हटलं.

कसोटीसाठी तयार

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं भारताचा कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूर इथं तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे.


हेही वाचा -

मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या

महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवडसंबंधित विषय
ताज्या बातम्या