Advertisement

मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या


मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या
SHARES

व्हर्जिन अटलांटिक या विमानसेवा कंपनीनं आठवड्यातील ७  दिवस उडणारी थेट विमानसेवा दिवाळीच्यानिमित्तानं सुरू केली आहे. त्यामुळं आता मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमानसेवा सुरू झाल्या आहेत. व्हर्जिन अटलांटिक कंपनीनं बोइंग ८७८-९०० या विमानाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनमधील हिथ्रो विमानतळासाठी थेट विमानसेवा लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सुरू केली आहे.

विमानसेवा 

मुंबई - लंडन या मार्गावरील एकूण विमानसेवांचा साप्ताहिक आकडा ३३ झाला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानप्रवाशांची संख्या साडे पाच लाख होती. ती यावर्षी आणखी वाढणार असून मुंबई-लंडन हा भारतातील सर्वाधिक मागणीचा आंतरराष्ट्रीय हवाईमार्ग असल्याचं समजतं.

महत्त्वाच्या थेट विमानसेवा

याशिवाय, २ महत्त्वाच्या थेट विमानसेवादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एअर इंडियानं कुवैत व कोलोंबोसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत गरुडा इंडोनेशिया, जझीरा एअरलाइन्स, एअर इटाली, रवांड एअर, एअर टांझानिया, स्टार एअर व उझबेकिस्तान एअरेवज यांनी नवीन सेवा सुरू केल्या आहेत. यामुळेच मुंबई हे बाली, मिलान, ताश्कंद, मॅन्चेस्टर, फुकेट, गाँगझाऊ, माले व दार एस सलाम या जगातील महत्त्वाच्या विमानतळांशी थेट जोडले गेले आहे.हेही वाचा -

मेट्रोसाठी आणखी ३०० झाडं कापली जाणार

पुनर्मूल्यांकनातून मुंबई विद्यापीठाची २ कोटी ३६ लाख रुपयांची कमाईRead this story in English
संबंधित विषय