नवीन वर्ष सुरु झालं की सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये यंदाची आयपीएल एप्रिल महिन्यात होणार की मे महिन्यात होणार अशी चर्चा रंगते. यंदाही अशी चर्चा रंगली होती. २०१९ मध्ये एप्रिल-मे महिन्यात भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे यंदाची आयपीएल भारतामध्ये होणार का नाही अशी चर्चा होती. मात्र, मंगळवारी दिल्लीमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीमध्ये यंदाची आयपीएल भारतातचं होणार असल्याचं ठरवण्यात अालं अाहे. २३ मार्चपासून आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
नवी दिल्ली येथे प्रशासकीय समितीच्या सदस्यांची आयपीएल २०१९ बाबत बैठक झाली. आयपीएल २०१९ स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. या बैठकीत आयपीएल २०१९ स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २३ मार्चपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान, अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी प्रशासकीय समिती संघ मालकांशी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा -
ऐतिहासिक विजयामुळे बीसीसीअायकडून खेळाडूंसह प्रशिक्षकांना बोनस