Advertisement

अाशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत


अाशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत
SHARES

इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघाला अाशिया चषक स्पर्धेच्या अाव्हानाला सामोरे जावे लागणार अाहे. अाशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड मुंबईत केली जाणार अाहे. एमएसके प्रसादच्या अध्यक्षतेखालील तसेच सरणदीप सिंग अाणि देवांग गांधी यांचा समावेश असलेल्या निवड समितीची बैठक वानखेडे स्टेडियममधील बीसीसीअायच्या मुख्यालयात होणार अाहे. त्यानंतर भारतीय संघ जाहीर करण्यात येईल. अाशिया चषक स्पर्धेला संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार अाहे. अ गटात भारत, पाकिस्तानचा समावेश असून ब गटात श्रीलंका, बांगलादेश अाणि अफगाणिस्तान हे संघ असतील. भारत-पाकिस्तान यांच्यातील महालढत १९ सप्टेंबर रोजी होणार असून अंतिम सामना दुबईत २८ सप्टेंबरला होईल.


यांना संधी मिळणार?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात विराटसह, रोहित शर्मा, शिखर धवन यांची निवड निश्चित मानली जात असून महेंद्रसिंग धोनीही संघात कायम असेल. रिषभ पंत याला राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता अाहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार दुखापतीतून फिट झाला असून त्याचीही निवड होण्याची अपेक्षा अाहे. जसप्रीत बुमरा, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल.


रहाणे इन?

अायपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही मुंबईकर अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संधी मिळाली नव्हती. अाता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अापली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरही रहाणेला अाशिया चषकासाठी संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार अाहे. त्याचरोबर केदार जाधवही दुखापतीतून बरा झालेला अाहे. पण अद्यापी तो यो-यो फिटनेस टेस्टला सामोरा गेलेला नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या समावेशाबाबत साशंकता अाहे.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा