Advertisement

मुंबईनं चौथ्यांदा जिंकली आयपीएल, चेन्नईवर १ धावेनं मात

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात मुंबईनं १ धावेने चेन्नईला पराभूत केलं आहे. या विजयासह मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

मुंबईनं चौथ्यांदा जिंकली आयपीएल, चेन्नईवर १ धावेनं मात
SHARES

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात मुंबईनं १ धावेने चेन्नईला  पराभूत केलं आहे. या विजयासह मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर १५० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला सामन्याच्या अंतिम षटकातील एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण जलद गोलंदाज लसिथ मलिंगानं शेवटच्या चेंडूवर गडी बाद करत मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं.


१५० धावांच्या आव्हान

मुंबईनं ठेवलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसननं अर्धशतकी खेळी आणि फाफ डु प्लेसिस यानं तुफान फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, मोठा फटका खेळण्याचा नादात क्विंटन डी कॉकनं त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रैना देखील ८ धावा करत झेलबाद झाला. तसंच, मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात बाद झाला. त्याचप्रमाणं पहिली धाव पूर्ण केल्यावर खराब क्षेत्ररक्षणामुळं कर्णधार धोनीनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, ईशान किशननं थ्रो करत त्याला धावचीत केलं. या सामन्यात धोनीला केवळ ८ चेंडूत २ धावा करता आल्या.


प्रथम फलंदाजी

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर संघाची धावगती मंदावली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनीही चांगली फलंदाजी करता आली नाही. तसंच, कृणाल पंड्यालाही जास्त धावा करता आल्या नाही. दरम्यान, मुंबईचा अर्धा संघ माघारी परतल्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. सुरेश रैनानं ५ धावांवर पंड्याला जीवदान दिले. या जीवदानाचा फायदा पंड्याला घेता आला नाही. पंड्या १६ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये पोलार्डनं धडाकेबाज फलंदाजी केली. पोलार्डनं २५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत चेन्नई सुपर किंग्ससमोर १५० धावांचं आव्हान ठेवलं.

या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईच्या दीपक चहर यानं ३ विकेट्स घेतल्या. तसंच, शार्दुल ठाकुर आणि इमरान ताहीर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणं मुंबईकडून बुमराहनं २ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, कृणाल पंडया, मलिंगा आण राहुल चहर यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या आहेत.हेही वाचा -

व्हायरल व्हिडिओ अंगलट, विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसावर कारवाईRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement