Advertisement

मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, दिल्लीवर ४० धावांनी मात

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं ४० धावांनी दिल्लीवर विजय मिळवला आहे. तसंच, या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे.

मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, दिल्लीवर ४० धावांनी मात
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) बाराव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या सामन्यात मुंबईनं ४० धावांनी दिल्लीवर विजय मिळवला आहे. तसंच, या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. 


प्रथम फलंदाजीचा निर्णय

नाणेफेक जिंकत मुंबईनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितनं २२ चेंडूंत ३० धावा केल्या, तर डीकॉकनं २७ चेंडूंत ३५ धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर मुंबईची धावगती थोडीशी मंदावली. परंतु, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कृणाल आणि हार्दिक या पंड्या बंधूंनी संघाचा डाव सावरत दिल्ली पुढे १६९ धावांचे आव्हान ठेवलं.


१६९ धावांचं आव्हान

मुंबईनं दिलेल्या १६९ धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली.  शिखर धवननं २२ चेंडूंत ३५ धावा केल्या. परंतु, धवन बाद झाल्यावर दिल्लीचे ४ फलंदाज झटपट बाद झाले. पण ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीचं आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीला सामना जिंकवून देण्यात ते अपयशी ठरले.


गोलंदाजांची कमाल

या सामन्यात मुंबईकडून राहुल चहरनं ३ गडी बॅड केले, तर जसप्रीत बुमराहनं २ गडी बाद केले. तसंच, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यानं प्रत्येकी १-१ बळी घेतले. त्याचप्रमाणं, दिल्लीकडून कगिसो रबाडानं २ तर अक्षर पटेल आणि अमित मिश्रानं प्रत्येकी १-१ बळी घेतला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा