Advertisement

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४० धावांनी विजय


सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४० धावांनी विजय
SHARES

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईन ४० धावांनी हैदराबादचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं १३७ धावांचे आव्हान हैदराबादपुढे  ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला फक्त ९६ धावा करता आल्या. दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा मायदेशी परतल्यानं त्याच्या जागी अल्झारी जोसेफला संघात समाविष्ट करण्यात आले, मुंबईच्या संघातून पहिलाच सामना खेळताना जलद गोलंदाज अल्झारी जोसेफनं १२ धावांत ६ गडी बाद केले. 


पोलार्डची धमाकेदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना पोलार्डनं धमाकेदार फलंदाजी केली. पोलार्डनं ४ षटकार आणि २ चौकार मारत २६ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. त्याशिवाय, या सामन्यात मुंबईनं युवराजच्या जागी संघात ईशान किशनला स्थान देण्यात आलं होतं. किशननं २१ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्याला या सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. हार्दीकनं १४ चेंडूत १४ धावा केल्या.


दमदार गोलंदाजी

या सामन्यात हैदराबादनं नाणेफेक जिंकत सुरुवातीला दमदार गोलंदाजी केली. मुंबईला सातत्याने धक्के देत हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावसंख्या रोखण्याचे काम चोख बजावले. यावेळी गोलंदाजी करताना सिद्धार्थ कौल यानं २ गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, राशीद खान आणि नाबी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा