Advertisement

मुंबई इंडियन्स संघातील 'हे' खेळाडू करारमुक्त


मुंबई इंडियन्स संघातील 'हे' खेळाडू करारमुक्त
SHARES

इंडियन प्रमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या सीझनसाठी मुंबई इंडियन्सनं संघातील १२ खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. युवराज सिंह याच्यासह १२ खेळाडूंना रिलीज केलं आहे. या खेळाडूंची यादीही जारी करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा विजेतेपद मिळवून देणारे प्रमुख खेळाडू मुंबई इंडियन्सनं रिटेन केले आहेत. मात्र, १२ खेळाडूंना करारमुक्त करण्यात आलं. मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, स्टेफाने रुदरफोर्ड आणि धवल कुलकर्णीचाही समावेश आहे.

खेळाडूंचा लिलाव

आयपीएल २०२० साठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सकडे ५ मायदेशी आणि २ परदेशी खेळाडूंचा स्लॉट बाकी आहे. दरवर्षी बंगळुरूत पार पडणारा लिलाव यावर्षी पहिल्यांदाच कोलकात्यात होणार आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सनं युवा फिरकीपटू मयंक मार्कंडेय आणि फलंदाज सिद्धेश लाड यांना अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला ट्रेड-आऊट केलं.

रिटेन केलेले खेळाडू : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमरा, कृणाल पंड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डी कॉक, कीरन पोलार्ड, स्टेफाने रदरफोर्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लाघन, ट्रेंट बोल्ट.

रिलीज केलेले खेळाडू : एविन लेविस, एडम मिलने, जेसन बेहरेनड्रॉफ, बेन कटिंग, युवराज सिंह, मयंक मार्कंडेय, बरिंदर सरण, रासिक सलाम, पंकज जसवाल, सिद्धेश लाड आणि अल्जारी जोसेफ.



हेही वाचा -

रणजित सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, चोरट्यांनी खातं केलं साफ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा