Advertisement

ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, चोरट्यांनी खातं केलं साफ

काही चोरटे इंटरनेटचा गैरवापर करुन ऑनलाईन मिळणाऱ्या दारुच्या दुकानाची संपूर्ण माहिती चोरत आहेत. त्याचबरोबर ज्या ग्राहकाने ऑनलाईन दारु मागवली आहे त्यांना दारुच्या दुकानासह स्वत:चा मोबाईल नंबर देत आहेत.

ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, चोरट्यांनी खातं केलं साफ
SHARES
Advertisement

 विकेंड आणि थंडीचे वातावरण झाल्याने बियर किंवा रम  पिण्याचे प्रमाण वाढते. त्यातच आता वाईन शाॅपवाल्यांनी घरपोच डिलिव्हरी देण्यास सुरूवात केल्याने अनेक जण ऑनलाईन  दारुची ऑर्डर देऊन घरीच दारु पिण्याचा बेत आखतात. मात्र ऑनलाईन दारु मागवणे तुम्हाला महागात पडू शकते. आठवड्याभरात पश्चिम उपनगरात २० जणांना ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पश्चिम उपनगरात एक विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली असून त्या पथकाने नुकतीच अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे.

काही चोरटे इंटरनेटचा गैरवापर करुन ऑनलाईन मिळणाऱ्या दारुच्या दुकानाची संपूर्ण माहिती चोरत आहेत. त्याचबरोबर ज्या ग्राहकाने ऑनलाईन दारु मागवली आहे त्यांना दारुच्या दुकानासह स्वत:चा मोबाईल नंबर देत आहेत. नशेत किंवा विश्वास ठेवून ग्राहक पैसे भरण्याच्या उद्देशाने त्या चोरट्यांना डेबीट किंवा क्रेडिट कार्डची माहिती देतात. त्यानंतर काही तासात ग्राहकांचे पैसे खात्यातून जातात. नुकताच असा प्रकार अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला.

तक्रारदार हा एका मोबाईल सर्व्हिस स्टोअर्समध्ये अधिकारी आहे. या व्यक्तीने वाईन घरपोच करणाऱ्या दुकानांचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याला अंधेरीतील एका वाईन शॉपचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्याने दूरध्वनी करून वाईन मागवली व कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला. परंतु, या पद्धतीने पैसे स्वीकारणे बंद केल्याचे त्याच्याकडून सांगून क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी असा तपशील घेण्यात आला. यापूर्वीही तेथून वाईन मागवल्यामुळे शंका आली नाही. ओटीपी शेअर करताच तक्रारदाराच्याा मोबाइलवर पहिल्यांदा ३१  हजार ७७७ हजार काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर पुन्हा ३१  हजार ७७७ हजार आणि राञी ११ च्या सुमारास ६१ हजार काढल्याचा मेसेज आल्याचे तक्रारदाराने सांगितले.

अशा घटनांना सध्या पश्चिम उपनगरात उत आला आहे. पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू परिसरात अशा तक्रारींची वाढ झाली आहे. बांद्रा, सांताक्रुझ, खार, जुहू, अंधेरी, ओशिवरा,वर्सोवा या पोलिस ठाण्यात आठवड्याभरात २० तक्रारी दाखल झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी निवडत विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने राजस्थानहून एका आरोपीस नुकतीच मोठ्या शिताफीने  अटक केली आहे.  हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आॅनलाईन दारू विक्रीसाठी दिसणाऱ्या बोगस वाईन शाॅपच्या नंबरखाली खासगीतून प्रतिक्रिया देत, या साईटहून मद्यविक्री न करण्याचे आवाहन केले आहे. वांद्रे पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने अशा प्रकारे फसवणूक करत असलेले पाच पेज नंबर बंद करण्यासाठी गुगलला पत्र लिहिले आहे.  हेही वाचा -

पीएमसी घोटाल्यातील आरोपी रणजित सिंगच्या घराची ईडीकडून झडती
संबंधित विषय
Advertisement