Advertisement

IPL 2021 : CSKनं 'या' खेळाडूला ठेवलं कायम!

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामासाठी सर्व संघ मालकांनी खेळाडूंची आदला-बदली करण्यास सुरूवात केली.

IPL 2021 : CSKनं 'या' खेळाडूला ठेवलं कायम!
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामासाठी सर्व संघ मालकांनी खेळाडूंची आदला-बदली करण्यास सुरूवात केली असून, काही खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे. त्यानुसार, आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईनं आपल्या संघात सुरेश रैनाला कायम ठेवलं आहे. तर हरभजन सिंहला रिलीज करण्यात आलं आहे.

दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये दोघांनीही माघार घेतली होती. चेन्नईच्या एका आधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याशिवाय, हरभजन सिंहनं ही ट्विट करत चेन्नईसोबतचा आपला प्रवास संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

'CSK सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत २ वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!', असं हरबजन सिंहनं ट्विट करत म्हटलं आहे.

हरभजन सिंहला मार्च २०१८ मध्ये चेन्नईच्या संघात स्थान मिळालं होतं. त्यावेळी चेन्नईनं २ कोटी रुपयामध्ये हरभजनला खरेदी केलं होतं. हरभजन सिंहनं २०१९ मध्ये चेन्नईकडून खेळताना ११ सामन्यात १६ बळी घेतले होते. २०२० मध्ये दुबईत होणाऱ्या आयपीएलमध्ये वयक्तिक कारणामुळं हरभजन सिंहनं माघार घेतली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा