Advertisement

IPL 2021 : यंदाही आयपीएलवर कोरोनाचं संकट; अनेक खेळाडू बाधित

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल २०२१ पासून) सुरूवात होणार आहे.

IPL 2021 : यंदाही आयपीएलवर कोरोनाचं संकट; अनेक खेळाडू बाधित
SHARES

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल २०२१ पासून) सुरूवात होणार आहे. मात्र यंदाच्या आयपीएलवर ही कोरोनाचं (coronavirus) सावट आहे. अनेक खेळाडू हे कोरोनानं ग्रासले असून, यामध्ये कर्मचाऱ्यांचा ही समावेश अधिक आहे. आयपीएलमध्ये (ipl 2021) एका आठवड्यात ४ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोलकाता नाईड रायडर्सचा नीतीश राणा कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली. मात्र, नीतीशनं कोरोनावर मात करुन पुन्हा मैदानात सरावासाठी हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे. नीतीश हा केकेआरच्या सलामीच्या फलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलचे सामने सुरु होणार असतानाच दुसरीकडे देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघालाही मालिका सुरु होण्याआधी कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. आरसीबीच्या २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. २२ मार्चच्या चाचणीमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र देवदत्तने कोरोनावर मात केली असून नुकत्याच घेतलेल्या चाचणीत तो कोरोनामुक्त झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय, अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा ७ एप्रिल रोजीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. २८ मार्च रोजी अक्षर सरावासाठी संघाच्या कॅम्पमध्ये आला तेव्हा त्याचा करोना चाचणीचा निकाल निगेट्व्ही होता. मात्र, त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळेच आता अक्षर पहिले काही सामने खेळू शकणार नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनाही करोनाची लागण झालीय. एके काळी भारतीय क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या सामितीचे प्रमुख राहिलेले मोरे हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंट टीमचे सदस्य आहेत. ५८ वर्षीय मोरे यांचा ६ एप्रिलचा करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आलाय. सध्या मोरे आयसोलेशनमध्ये आहेत.

आयपीएलमधील खेळाडूच नाही तर ग्राउण्ड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीममधील सदस्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. मुंबईतील वानखडे स्टेडियमवरील ग्राउण्ड स्टाफपैकी ११ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमधून सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या टीममधील १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा