Advertisement

दिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखून विजय

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं ६ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला आहे.

दिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखून विजय
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं ६ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, फिरकीपटू अमित मिश्रानं केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज चेन्नईच्या मैदानावर मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले.

रोहित शर्मानं या सामन्यात सर्वाधिक (४४) धावा केल्या. मात्र, मुंबईचे इतर फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईनं २० षटकात ९ बाद १३७ धावा उभारल्या. अमित मिश्राने ४ षटकात २४ धावा देत ४ बळी घेतले. रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला.

डि कॉकनं २ धावा केल्या. त्यानंतर रोहितनं सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी १ बाद ५५ धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले. चांगल्या फॉर्मात खेळणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने सातव्या षटकात गमावले. सूर्यकुमारने २४ धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने ३ षटकार आणि ३ चौकारांसह ४४ धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने २६ तर यादवने २३ धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने १५ धावा देत २ बळी टिपले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा