Advertisement

IPL 2021 : उर्वरित सामन्यांची तारीख ठरली; वाचा सविस्तर

आयपीएलमधील (Ipl) ३१ लढती कधी होणार याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे.

IPL 2021 : उर्वरित सामन्यांची तारीख ठरली; वाचा सविस्तर
SHARES

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या (Ipl 2021) १४व्या हंगामाला ब्रेक लागला होता. स्पर्धा सुरू असताना बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काहींना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. या स्पर्धेतील ३१ लढती अद्याप शिल्लक आहेत.

आयपीएलमधील (Ipl) ३१ लढती कधी होणार याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. बीसीसीआय यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलच्या नव्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलचा १४वा हंगाम १९ किंवा २० सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होऊ शकतो. स्पर्धेतील शिल्लक लढती युएइमध्ये होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या देशातील क्रिकेट बोर्ड आणि आयपीएलमधील संघ यांच्याशी चर्चा सुरू आहे. बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलची फायनल १० ऑक्टोबर रोजी खेळवली जाऊ शकते.

भारतीय संघ इंग्लंडमधून १५ सप्टेंबर रोजी युएईमध्ये दाखल होईल. त्यानंतर ३ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असेल. अन्य देशातील खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळून थेट आयपीएल खेळण्यासाठी येतील. सीबीएल २८ ते १९ सप्टेंबर या काळात होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीपीएल नियोजित वेळेआधी पूर्ण करण्याबाबत चर्चा सुरू आहे.हेही वाचा - 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा