Advertisement

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सनं कर्णधार पदावरून स्टीव्ह स्मिथला केलं रिलिज

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वाच्या मिनी ऑक्शन म्हणजेच प्राथमिक लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सनं संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला करार मुक्त करण्याचा (रिलिज करण्याचा) निर्णय घेतला आहे.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सनं कर्णधार पदावरून स्टीव्ह स्मिथला केलं रिलिज
SHARES

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वाच्या मिनी ऑक्शन म्हणजेच प्राथमिक लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सनं संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला करार मुक्त करण्याचा (रिलिज करण्याचा) निर्णय घेतला आहे. बरीच चर्चा केल्यानंतर राजस्थान संघाच्या व्यवस्थापनानं हा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे.

स्टीव्ह स्मिथनं २०१४,२०१५, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. मागील पर्वामध्ये राजस्थानचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये अगदी तळाशी होता. याच कारणामुळं स्मिथला वगळण्याचा निर्णय संघानं घेतल्याचं समजतं. राजस्थान रॉयल्सनं ही ट्विटरवरुन यासंदर्भातील एक पोस्ट करत राजस्थानचा संघ स्मिथचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मागील पर्वामध्ये स्मिथचं नेतृत्व अपेक्षेपेक्षा खूपच वाईट कामगिरी असणारं ठरलं. बेन स्टोक्सचा संघात समावेश करण्यात आलेल्या संघानं चांगली कामगिरी केल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यानंतरही संघ पॉइण्ट टेबलमध्ये तळाशीच होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा