Advertisement

राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थाननं ४ गडी राखून मुंबईचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकॉक याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं १८८ धावांचे आव्हान राजस्थानपुढे ठेवलं होतं.

राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय
SHARES

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थाननं ४ विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकॉक याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं १८८ धावांचे आव्हान राजस्थानपुढे ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली सुरुवात करून दिली. तसंच, या सामन्यात बटलर यांन ८९ धावांची धमाकेजदार खेळी केली. बटलरनं ४३ चेंडूत ७ षटकार आणि ८ चौकार मारत ८९ धावा केल्या. तर राजस्थान संघाचा कर्णधार अजिक्य रहाणे यानं २१ चेंडूत ३७ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मानं कमबॅक केलं असून ४७ धावा केल्या. 


१८८ धावांच आव्हान

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर खेळाडूंनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. रोहित शर्मानं चेंडूत ४७ धावा केल्या, तर क्विंटन डिकॉक यानं ५२ चेंडूत ६ षटकार आणि ४ चौकार मारत ८१ धावा केल्या. त्यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या पोलार्ड या सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. तसंच,  हार्दीकनं ११ चेंडूत २८ धावांची खेळी करत राजस्थानसमोर १८८ धावांच आव्हान ठेवलं.


गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात राजस्थाननं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांना फारसी चांगली गोलंदाजी करता आली नाही. यावेळी गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर यानं ३ गडी बाद केले, तर धवल कुलकर्णी आणि जयदेव उनादकट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. तसंच, मुंबईच्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करता आली. मुंबईकडून कृणाल पांड्याने ३, जसप्रीत बुमराहने २तर राहुल चहरने १ विकेट घेतल्या.हेही वाचा -

राज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोला

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!संबंधित विषय
Advertisement