Advertisement

लालचंद राजपूत बनले झिम्बाब्वेचे हंगामी प्रशिक्षक


लालचंद राजपूत बनले झिम्बाब्वेचे हंगामी प्रशिक्षक
SHARES

भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक अाणि वेगवान गोलंदाज हिथ स्ट्रिक यांची जागा राजपूत यांनी घेतली अाहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी झिम्बाब्वे संघ पात्र ठरला नसल्यामुळे स्ट्रिक यांची हकालपट्टी करण्यात अाली अाहे.


काही दिवसांपूर्वीच त्यांचा मला फोन अाला. झिम्बाब्वे क्रिकेटला पुढे नेण्यासाठी हिच योग्य संधी असल्यामुळे मी ही अाॅफर स्वीकारली.
- लालचंद राजपूत, भारताचे माजी प्रशिक्षक

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानेही या बातमीला दुजोरा दिला असून अापल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याची घोषणाही केली अाहे.

 

कोण अाहेत लालचंद राजपूत

लालचंद राजपूत हे भारताकडून दोन कसोटी अाणि ४ एकदिवसीय सामने खेळले असून मुंबई क्रिकेटमधील एक नावाजलेलं नाव म्हणून त्यांना अोळखलं जातं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते सलामीला फलंदाजीस उतरत असत. २००७ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-२० वर्ल्डकप पटकावला, त्यावेळी ते भारतीय संघाचे मॅनेजर होते.


राजपूत यांची प्रशिक्षकपदाची इनिंग

राजपूत यांनी २०१६ पर्यंत अफगाणिस्तान संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं. अाता याच संघाला कसोटी दर्जा प्राप्त झाला अाहे. गेल्या डोमेस्टिक मोसमात ते अासाम संघाचे प्रशिक्षक होते. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत राजपूत होते, मात्र रवी शास्त्री यांनी हे पद पटकावलं. राजपूत यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई प्रीमिअर लीगमध्येही सल्लागाराची भूमिका निभावली होती. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली अाहेत.


हेही वाचा -

अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका

वानखेडेवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना पाणीकपातीचा फटका?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा