Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

धोनीच्या पुनरागमनासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले

चांगली कामगिरी करून धोनी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो

धोनीच्या पुनरागमनासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) २०१९-२० या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार गुरूवारी जाहीर केले आहेत. मात्र, बीसीसीआयच्या वार्षिक करारात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला स्थान मिळालं नाही आहे. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, धोनीचं संघात पुनरागमन होणार का? अशाप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु, धोनीसाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

धोनीला वार्षिक करारातून वगळण्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून, खेळाडूंचे वार्षिक करार आणि संघ निवड याचा दुरान्वयेही संबंध नाही. चांगली कामगिरी करून धोनी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, अशी माहिती मिळते. बीसीसीआयच्या नियमानुसार नियमितपणे जे खेळाडू खेळत आहेत त्यांनाच नव्याने करारबद्ध केले जाते. धोनीच्या बाबतीत वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास धोनी २०१९च्या विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे नव्या करारामध्ये त्याचा समावेश करण्यात आलं नसल्याची माहिती समोर येत आहे.

भारतीय संघाचे दरवाजे आजही महेंद्रसिंग धोनीसाठी खुले आहेत. धोनीला राष्ट्रीय संघात परतायचे असेल तर चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे. धोनी संघात परतल्यास तो टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. खेळाडूंचे वार्षिक करार आणि धोनीच्या क्रिकेटमधील भविष्याचा कोणताही संबंध नाही. यापूर्वी अनेक खेळाडू करारबद्ध नसतानाही भारतीय संघातून खेळलेल्याचं समजतं. भविष्यातही अशाप्रकारे कामगिरी पाहून खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

बीसीसीआयनं ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळासाठी जाहीर केलेल्या खेळाडूंच्या वार्षिक करारानुसार, ए प्लस श्रेणीत कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा