Advertisement

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी


ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी
SHARES

चर्चगेट येथील क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या (सीसीअाय) ब्रेबाॅर्न स्टेडियमवर अलीकडेच ८२० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात अाला अाहे. या प्लांचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात अाले. स्टेडियमच्या छतावर ३६० डब्ल्यूपी क्षमतेचे २२८० सोलार पॅनेल बसविण्यात अाले अाहेत. हे पॅनेल स्टेडियममधील नाॅर्थ अाणि वेस्ट स्टँडच्या छतावर बसविण्यात अाले अाहेत. या सौरउर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी ११.५ लाख यूनिट वीजनिर्मिती होणार असून म्हणजेच दिवसाला जवळपास ३२८० यूनिट वीजेची निर्मिती केली जाणार अाहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १.२५ कोटी रुपयांची बचत होणार अाहे.


गरज ९५०० यूनिट्सची

ब्रेबाॅर्न स्टेडियमसह सीसीअायला दिवसाला ९,५०० यूनिट्सची अाणि वर्षाला जवळपास ३५ लाख यूनिट्सची गरज असते. त्यामुळे सीसीअायला दरवर्षी वीजबिलासाठी ५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. अाता ३२८० यूनिट्सची निर्मिती सीसीअाय स्वत:च करणार असल्यामुळे त्यांना भविष्यात चांगलाच फायदा होणार अाहे. हा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १२० दिवसांचा कालावधी लागला तर ३.८५ कोटी रुपये खर्च करावे लागले.


मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

पर्यावरण बदलाच्या दृष्टिकोनातून सीसीअायने उचललेले हे पाऊल खूपच कौतुकास्पद अाहे. पब्लिक स्टँडच्या डोक्यावर असलेल्या छतावर २२८० सोलार पॅनेल बसविण्यात अाले अाहे. १२० दिवसांत इतक्या मोठ्या क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारणे, हाच एक विक्रम अाहे. फ्लडलाइट्ससाठी जनरेटर अाणि अन्य स्त्रोतांतून पर्यायी वीजेची गरज असते. अाता सीसीअायकडून हरित उर्जा निर्माण केली जाणार अाहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा -

एमसीएला मिळाले पूर्ण सदस्यत्व!

पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा