पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड


SHARE

मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शाॅ याची इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात अाली अाहे. खराब कामगिरीमुळे सलामीवीर मुरली विजयला घरचा रस्ता दाखविण्यात अाला असून अाता पृथ्वी शाॅ त्याची जागा घेणार अाहे. त्याचबरोबर अांध्रचा फिरकी गोलंदाज हनुमा विहारी यालाही भारतीय संघात स्थान मिळाले अाहे. पाहुण्या भारतीय संघाने ट्रेंट ब्रिज येथील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवून या मालिकेतील पिछाडी १-२ अशी भरून काढली अाहे. अाता ३० अाॅगस्टपासून साऊदम्प्टन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत पृथ्वी शाॅला 'टेस्ट कॅप’ मिळते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार अाहे.पृथ्वीच्या नावावर सात शतकं

पृथ्वी शाॅने अातापर्यंत १४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सात शतके झळकावली असून या वर्षी त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकण्याची करामत केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच पृथ्वी शाॅला भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले. जुलैै महिन्यात त्याने बेकेनहॅम येथे वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध १८८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्धही शतके सादर केली होती. हनुमा विहारी यानेही रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असून त्याच्या नावावर ६३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १५ शतकांसह ५१४२ धावा केल्या अाहेत.


भुवनेश्वर कुमारला नो एंट्री

पाठीच्या दुखापतीमुळे मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी वगळण्यात अाले होते. पण अखेरच्या दोन सामन्यांसाठीही त्याला भारतीय संघात स्थान मिळवता अाले नाही. ट्रेंट ब्रिज कसोटीत अाॅफस्पिनर रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली मात्र चौथ्या कसोटीअाधी तो फिट होईल, अशी अाशा अाहे.


भारतीय कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषक्ष पंत, हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, करुण नायर, दिनेश कार्तिक, हनुमा विहारी.


हेही वाचा -

विरार ते भारताचा U-19 कर्णधार, ‘वंडर बाॅय' पृथ्वी शाॅची संघर्षगाथा

पृथ्वी म्हणतो, 'मी अांतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज'संबंधित विषय
ताज्या बातम्या