Advertisement

सूर्यकुमार यादवला भारत अ संघात स्थान


सूर्यकुमार यादवला भारत अ संघात स्थान
SHARES

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून अायपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला अापल्या मेहनतीचं फळ मिळालं अाहे. अनेक वर्षे मुंबई क्रिकेटची सेवा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला अखेर भारत अ संघात संधी मिळाली अाहे. अाॅस्ट्रेलिया अ, भारत ब अाणि दक्षिण अाफ्रिका अ संघाचा समावेश असलेल्या चौरंगी मालिकेसाठी सूर्यकुमारची भारत अ संघात निवड झाली अाहे. त्याअाधी भारत अ संघ बंगळुरू येथे दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळणार अाहे.


श्रेयस अय्यरकडे नेतृत्व

मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरकडे भारत अ संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात अाली अाहे. चौरंगी मालिकेत भारत ब संघही सहभागी होणार असून त्याचे कर्णधारपद मनीष पांडेकडे देण्यात अालं अाहे. चौरंगी मालिका विजयवाडा येथे १७ ते २९ अाॅगस्टदरम्यान रंगणार अाहे.


पृथ्वी शाॅची निवड

भारताला १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार पृथ्वी शाॅ यालाही भारत अ संघात स्थान मिळालं अाहे. त्यामुळे चौरंगी मालिकेत पृथ्वीसह श्रेयस अाणि सूर्यकुमार असे मुंबईचे तीन फलंदाज देशाचं प्रतिनिधित्व करणार अाहेत.


हेही वाचा -

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'

मुंबईच्या अाणखी एका प्रशिक्षकाचा राजीनामा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा