Advertisement

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'

विराट कोहली मैदानाबाहेर तितकाच तो प्रेमळ अाणि सर्वांसाठी प्रेरणादायी अाहे. कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे तो सर्वांची काळजी घेतो. भारतीय संघात माझी पहिल्यांदा निवड झाली होती, त्यावेळचा क्षण माझ्यासाठी संस्मरणीय अाहे. कारण त्यावेळी विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरीचा फोन गिफ्ट म्हणून दिला होता, हे शब्द अाहेत भारताचा डॅशिंग फलंदाज केदार जाधवचे.

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'
SHARES

विराट कोहली हा सर्वांसाठी अायकाॅन असून मी जेव्हापासून भारतीय संघात अालो अाहे, तेव्हापासूनच त्याने मला खूप पाठिंबा दिला अाहे. मैदानात तो जितका अाक्रमक अाहे, मैदानाबाहेर तितकाच तो प्रेमळ अाणि सर्वांसाठी प्रेरणादायी अाहे. कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे तो सर्वांची काळजी घेतो. भारतीय संघात माझी पहिल्यांदा निवड झाली होती, त्यावेळचा क्षण माझ्यासाठी संस्मरणीय अाहे. कारण त्यावेळी विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरीचा फोन गिफ्ट म्हणून दिला होता, हे शब्द अाहेत भारताचा डॅशिंग फलंदाज केदार जाधवचे. सध्या दुखापतीनं त्रस्त असलेल्या केदार जाधवनं 'सेलेब्स कनेक्ट’ या अॅपच्या अनावरणाप्रसंगी 'मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली.


लवकरच सरावाला सुरुवात

हॅमस्ट्रिंग दुखापतीतून मी अाता सावरत असून पुढच्या दोन ते तीन अाठवड्यात मी सरावाला सुरुवात होणार अाहे. माझ्या अपेक्षेपेक्षाही लवकर मी दुखापतीतून बरा होत अाहे. सध्या पाऊस असल्यामुळे फलंदाजी करता येत नाही. पण मी लवकरच मैदानात उतरणार अाहे.



माझा पुनर्जन्म झाला...

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुखापतीला सामोरं जावं लागल्याने मला अायपीएल, इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले. ३ महिन्यांचा हा कालावधी माझ्यासाठी खूपच खडतर असला तरी या कालावधीत मी भरपूर काही शिकलो. तंदुरुस्तीचे महत्त्व मला अधिक प्रमाणात उमगले. या तीन महिन्यांत माझा पुनर्जन्मच झाला, असं मी म्हणेन. दुखापती हा खेळाचाच एक भाग असला तरी यापुढे अाता कमी प्रमाणात दुखापती होतील, याची काळजी मी घेईन.



अाता यो-यो टेस्टची तयारी

भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी यो-यो टेस्ट पार करणं बंधनकारक करण्यात अालं अाहे. जसं नववीतून दहावीत जाण्यासाठी परीक्षा द्यावी लागते, त्याच पद्धतीनं मलाही या दिव्यातून जावं लागणार अाहे. त्यासाठी दररोज मी शारीरिक तंदुरुस्तीचा सराव करत अाहे. 


तीन वेळा झाली दुखापत

गेल्या डिसेंबर महिन्यात धरमशाला येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मला पहिल्यांदा दुखापतीचा त्रास जाणवला. त्यानंतर दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मला दुखापत झाली. त्यानंतर अायपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या उद्घाटनाच्या सामन्यातच मला दुखापत झाल्याने डाॅक्टरांनी मला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी अाॅस्ट्रेलियात मेलबर्न इथं जाऊन शस्त्रक्रिया केली.



हेही वाचा -

केदार जाधवला वेध पुनरागमनाचे!

केदार जाधवची अायपीएलमधून माघार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा