Advertisement

रोहित शर्माने कोणकोणते नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले? वाचा


रोहित शर्माने कोणकोणते नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले? वाचा
SHARES

कानपूरमध्ये रंगलेल्या वनडेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत सीरिजवर आपला कब्जा केला. या सामन्यात निर्णायक भूमिका निभावणाऱ्या रोहित शर्माने धुवादार बॅटिंग करून लोकांची मने तर जिंकलीच, याव्यतिरिक्त त्याने अनेक रेकॉर्ड्सही आपल्या नावे केले.

रोहितने या सामन्यात 138 चेंडूत 147 धावांची धडाकेबाज खेळी केली. इतकेच नाही तर त्याने यावेळी 18 चौकार आणि 2 षटकार लगावत हा सामना जिंकण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याचसोबत त्याने काही रेकॉर्डही आपल्या नावे केले


रोहित शर्माने केले हे रॅकॉर्ड

  • रोहित शर्माने न्यूझीलंडच्या विरोधात पहिला शतक ठोकला
  • वनडे सामन्यात सर्वात जलद गतीने 150 सिक्सर लगावणारा प्रथम भारतीय खेळाडू 
  • 2017 मधील एक दिवसीय सामन्यात 1,000  रन बनवणारा दूसरा भारतीय फलंदाज
  • कानपूरमध्ये सलग दोन शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज
  • क्रिकेट जगतात आतापर्यंत सर्वात जलदगतीने 150 सिक्सर लगावण्यात रोहित दुसऱ्या स्थानावर
  • पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा फलंदाज शाहिद अाफरीदी आहे
  • वनडेत 150 किंवा त्याहून अधिक षटकार जोडणारा पाचवा भारतीय खेळाडू


1 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला होणार सुरुवात

वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-20 मालिका 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा