Advertisement

इंडिया v/s न्यूझीलंड: वानखेडेवर विराट खेळणार २०० वा आंतरराष्ट्रीय सामना


इंडिया v/s न्यूझीलंड: वानखेडेवर विराट खेळणार २०० वा आंतरराष्ट्रीय सामना
SHARES

ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत 4-1 ने धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ रविवार २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड संघाशी दोन हात करणार आहे.  एकूण तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी मुंबईतील वानखेडे येथे मैदानावर रंगणार आहे.  आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत दक्षिण अफ्रिकेने भारताला मागे टाकत नुकताच पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा पराभव करत आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहेे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना कॅप्टन विराट कोहलीचा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. 

न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भारतीय संघाकडे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहली हे धुरंधर खेळाडू आहेत. कोहलीने फलंदाजीच्या क्रमवारीत स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले असून चौथ्या क्रमांकावर कोण असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने काही नवीन खेळाडूंना देखील संधी दिली आहे. त्यात हार्दिक पंड्या, मनीष पांडे आणि केदार जाधव यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी मागील काही सामन्यात संघाला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिनेश कार्तिकसह भारतीय अ संघात शानदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या शार्दुल ठाकूरला देखील या सामन्यात प्रवेश दिला आहे. यापूर्वीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घाम फोडायला लावणारे युजवेंद्र चहल आणि कलुदीप यादवकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांनी चमकदार अशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात टिकणे कठीण केले होते. या सामन्यात देखील ते न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


भारतीय संघ खालील प्रमाणे-


कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी, शार्दुल ठाकूर, शिखर धवन, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल


न्यूझीलंड संघ-

कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल, कोलिन डी ग्रँडहोम, रॉस टेलर, ट्रँट बाउल्ट, मॅट हेन्री, टॉम लाथम, एडम मिलने, ईश सोढी, केलिन मुनरो, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टिम साऊदी आणि जॉर्ज वॉकर



हेही वाचा - 

म्हणून, नेहरा घेतोय क्रिकेटमधून निवृत्ती?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा