म्हणून, नेहरा घेतोय क्रिकेटमधून निवृत्ती?


SHARE

भारतीय क्रिकेट संघातील फास्ट बॉलर आशिष नेहरा अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकरच निवृत्त होणार आहे. फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबरला खेळवल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे त्याने जाहीर केले.

नेहरा म्हणतो, 'निवृत्ती का घेत नाही यापेक्षा निवृत्ती का घेत आहे, असे कुणी जेव्हा विचारते तेव्हा चांगले वाटते. माझ्या या निवृत्तीबाबत संघ व्यवस्थापक आणि निवड समितीच्या प्रमुखाला सांगितले आहे. आपल्या घरच्या मैदानावर निवृत्ती घ्यायला मला नेहमीच आवडेल. रणजीतील माझा सर्वात पहिला सामना मी याच मैदानावर खेळलो. यशाचे शिखर गाठतानाच निवृत्ती घ्यायची अशी माझी इच्छा होती. मला वाटते ती वेळ आली आहे आणि मी त्याचे स्वागत करतो. 38 वर्षाच्या आशिष नेहराने याची माहिती भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना दिली आहे.IPL मधूनही घेतली निवृत्ती

नेहरा आता 22 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध होणारे तीन वनडे आणि तीन टी 20 मालिकांमध्ये खेळणार आहे. त्यानंतर 2018 मध्ये तो कोणत्याही टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार नाही. नेहरा म्हणाला चांगले प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना एक संधी मिळायला हवी. आता यापुढे आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.


1999 मध्ये भारतीय संघातून पहिल्यांदा खेळला सुरुवात करणाऱ्या नेहराने आतापर्यंत 117 टेस्ट, 120 वनडे आणि 26 टी-20 सामने खळले आहेत. त्याने टेस्टमध्ये 44, वनडेमध्ये 157 आणि टी20 मध्ये 34 विकेट्स घेतल्या आहेत. 2003 मध्ये डरबन येथे इंग्लंडविरोधात झालेल्या वर्ल्डकपमधील सामन्यात त्याने 23 धावा देत सहा विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड केला होता. आजारी असतानाही त्याने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. 2011 मध्ये झालेल्या वर्ल्डकप विजेत्या संघातील तो सदस्यही राहिला आहे. त्यावेळी सेमीफायनलमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात त्याने चमकदार प्रदर्शन केले होते. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने तो अंतिम सामना खेळू शकला नव्हता.
हेही वाचा - 

मुंबईकर क्रिकेटर अादित्य सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

संबंधित विषय