मुंबईकर क्रिकेटर अादित्य सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

  Mumbai
  मुंबईकर क्रिकेटर अादित्य सांभाळणार कर्णधारपदाची धुरा
  मुंबई  -  

  रणजी ट्रॉफीसाठी सोमवारी मुंबई क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. यावेळी कर्णधारपदाची धुरा मुंबईकर खेळाडू आदित्य तरे याच्याकडे सोपवण्यात आली  असून उप कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आली आहे. येत्या 14 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत इंदौर येथील होळकर स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. यावेळी सलामिची लढत मुंबई विरूद्ध मध्य प्रदेश, अशी होणार आहे.

  क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणऱ्या मुंबईने आतापर्यंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह पाच खेळाडू दिले आहेत. त्यात आता आदित्य तरेला देखील सुवर्णसंधी मिळाली आहे. आतंरराष्ट्रीय संघात मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे दोघे आपले वर्चस्व राखत असून धवल कुलकर्णी, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे भारताच्या अध्यक्षिय संघात खेळत आहेत, पण आता अजून एका मुंबईकर खेळाडूकडे रणजी सामन्याच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.


  एमसीए निवडणूक पुढे ढकलली

  मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सोमवारी झालेल्या बैठकीत 1 नोव्हेंबरला होणारी एमसीएची निवडणुकीची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीत मध्य प्रदेश विरूद्ध होणाऱ्या रणजी सामन्यांची देखील घोषणा करण्यात आली आहे.


  असा असेल मुंबईचा संघ-

  आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), आदित्य धुमाळ, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, आकाश पारकर, जय बिस्ता, शिवम मल्होत्रा, विजय गोहील, एकनाथ केरकर, रॉयस्टन डियास, मिनाद मांजरेकर, अभिषेक नायर, शुभम रांजणे, सुफियान शेख.


  हेही वाचा -

  मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.