मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक

 Pali Hill
मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक
मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक
मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक
मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक
मुंबईची रणजी फायनलमध्ये धडक
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबई आणि तमिळनाडूमध्ये झालेल्या रणजी करंडक सामन्यात मुंबईच्या पृथ्वी शॉनं पदार्पणातच शतक झळकावत मुंबईला रणजी फायनलचं तिकीटही मिळवून दिलं आहे. त्यामुळे आता रणजी करंडकाचा अंतिम सामना मुंबई आणि गुजरात या संघांमध्ये 10 ते 14 जानेवारी दरम्यान इंदुरमध्ये रंगणार आहे.

राजकोटला झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबईनं तमिळनाडूवर सहा विकेट्सनी मात केली. या सामन्यात तमिळनाडूनं मुंबईला विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. पृथ्वी शॉनं 174 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकारासह 120 धावांची खेळी उभारली. पृथ्वीच्या या कामगिरीमुळे मुंबईच्या संघाला अंतिम सामन्यात धडक देण्यास फारशी अडचण आली नाही. पहिल्या तीन विकेट्ससाठी तीन भागिदाऱ्या रचून त्यानं मुंबईला विजयपथावर नेलं. त्यानं प्रफुल्ल वाघेलाच्या साथीनं सलामीला 90 धावांची, श्रेयस अय्यरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची आणि मग सूर्यकुमार यादवच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली.

Loading Comments