मुंबई - रणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली. 1 जानेवारीला मुंबई विरुद्ध तामिळनाडू असा सामना राजकोट इथं होणार आहे. 1 जानेवारी ते 5 जानेवारी असा 5 दिवसाचा हा सामना असणार आहे. यासाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात आदित्य तरे (विकेट किपर/कप्तान), प्रफुल वाघेला, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, शार्दुल ठाकूर, बालविन्देर सिंग संधू, तुषार देशपांडे, रॉयस्टोन डायस (dias), सुफियान शेख (विकेट कीपर), विजय गोहिल, अक्षय गिरप, एकनाथ केरकर, पृथ्वी शव (prithvi shaw) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तरी मुंबई संघाचे अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक नायर याची देखील पुन्हा निवड करण्यात आली आहे.