सचिनची चमकदार कामगिरी

  Mumbai
  सचिनची चमकदार कामगिरी
  मुंबई  -  

  पाचव्या अहमद सरजी कप क्रिकेट लीग कम नॉक आऊट टुर्नामेंटमध्ये सचिनने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. आता तुम्हाला वाटले असेल हा सचिन तेंडुलकर असेल. सचिनने तर निवृत्ती घेतली आहे. पण हा सचिन तेंडुलकर नाही तर हा सचिन यादव आहे. गुरुवारी मुंबई सीसी विरुद्ध मलेशिया अशी ही लढत झाली. यामध्ये मुंबई सीसी संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.

  यामध्ये मुंबई संघाच्या सलामवीर सचिन यादवने 98 धावा करत सामना जिंकण्यात संघासाठी मोलाची कामगिरी केली. चार देशांच्या या सामन्यात यजमान श्रीलंका आणि बांग्लादेशमधील संघाचा देखील सहभाग होता.

  नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेत यजमान मलेशिया संघाला 45.5 षटकात फक्त 172 धावा करण्यात यश मिळाले. श्रेयांस बोगर 4/24 आणि शशी कदम 3/41 यांच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीमुळे त्यांना नुकसान झाले. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. यजमान मलेशिया संघाने सुरुवातीला अनपेक्षित कामगिरी केली. पण विजय मिळवण्यात यश प्राप्त करणे त्यांना थोडे अवघड गेले. दरमन्यान मुंबई संघाला जिंकण्यासाठी 173 धावांची गरज होती. सलामिवीर सचिन यादवने चमकदार कामगिरी करत नाबाद 98 धावा केल्या. त्याने पाच चौकर आणि दोन षटकार करत आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शतक पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या 2 धावा सचिनला मात्र पूर्ण करता आले नाही. मुंबई संघाच्या मोहद उसेद याने अर्धशतक पूर्ण करत 55 धावा केल्या.


  हेही वाचा - 

  चार मुंबईकरांची भारत अ क्रिकेट संघात निवड


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.