पहिल्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का

मुंबईच्या संघातील जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाची निवड स्थानिक स्पर्धेसाठी झाल्याने त्याला आयपीएलमधील सुरूवातीच्या सामन्याला मुकावं लागणार आहे.

SHARE

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १२ व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी दिल्ली कॅपिटल विरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या संघातील जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाची निवड स्थानिक स्पर्धेसाठी झाल्याने त्याला आयपीएलमधील सुरूवातीच्या सामन्याला मुकावं लागणार आहे.


स्पेशालिस्ट गोलंदाज

आयपीएलच्या ११ व्या हंगामात मलिंगाचा समावेश मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता. परंतू, १२ व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पुन्हा २ कोटी रुपयांना संघात दाखल करून घेतलं.  मलिंगा श्रीलंकेच्या वन डे संघाचा कर्णधार असून स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचं नेतृत्व करतो. ही स्पर्धा ४ ते ११ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या ६ सामन्यांना मुकावं लागणार आहे. दरम्यान, २६ मार्चला मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात पुन्हा दाखल होणार आहे.

'आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितलं आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद होता. परंतु, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता त्यांनी मला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितलं. त्यामुळे मी होकार कळवला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली, असं मलिंगाने सांगितलं. 


पहिला सामना

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या हंगामाचा पहिला सामना शनिवारी संध्याकाळी गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. परंतू, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रविवारपर्यंत प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.हेही वाचा -

'त्या' कृत्यामुळे जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल

जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या