Advertisement

'त्या' कृत्यामुळे जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल

आयपीएलच्या प्रमोशननिमित्त 'मुंबई इंडियन्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बुमरा एका सुरक्षारक्षकाशी हात न मिळवताच पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच ट्रोल केलं आहे.

'त्या' कृत्यामुळे जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल
SHARES

मागील काही महिन्यांपुर्वी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अशातच आता, 'मुंबई इंडियन्स'चा जलद गोलंदाज जसप्रीत बुमरा आपल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. आयपीएलच्या प्रमोशननिमित्त 'मुंबई इंडियन्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बुमरा एका सुरक्षारक्षकाशी हात न मिळवताच पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच ट्रोल केलं आहे. 


मुंबई इंडियन्सचा व्हिडिओ

आयपीएलच्या १२ व्या सीझनमधील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी दिल्ली विरुद्ध होणार आहे. त्यानिमित्त मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बुमरा एका कारमधून उतरताना दिसतो. त्यावेळी सुरक्षारक्षक त्याच्या कारचा दरवाजा उघडतो आणि बुमराला पाहून नमस्कार करतो. बुमरासुद्धा त्याच्यापुढे मान वाकवतो. मात्र, त्यानंतर सुरक्षारक्षक त्याच्याकडे शेकहँडसाठी हात पुढे करतो. परंतू, बुमरा त्याच्याकडे न पाहता, हात न मिळवताच पुढे निघून जातो. घमेंडखोर जसप्रीत

जसप्रीत बुमराच्या या कृत्यामुळे त्याचे चाहते चांगलेच संतापले आहेत. त्याशिवाय अनेकांनी जसप्रीत घमेंडखोर असल्याची टीका केली. काही जणांच्या मनात के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या 'कॉफी विथ करण'मधील आठवणी ताज्या झाल्या आणि क्रिकेटर्सना मूल्य शिक्षणाची आवश्यकता असल्याचं बऱ्याच जणांनी अधोरेखित केली.हेही वाचा -

झाकीर नाईकच्या फायनांन्सरला मुंबईतून अटक

काँग्रेसच्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार; निरूपम मात्र प्रतिक्षेतचसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा