Advertisement

मुंबई इंडियन्सचा कृणाल पंड्या अडकणार विवाहबंधनात


मुंबई इंडियन्सचा कृणाल पंड्या अडकणार विवाहबंधनात
SHARES

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या लग्नसराई सुरू अाहे. झहीर खान, भुवनेश्वर कुमार यांच्यापाठोपाठ अलीकडेच भारताचा कर्णधार विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत अापल्या संसाराला सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या हासुद्धा अाता या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवणार अाहे. धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या २७ डिसेंबरला मुंबईत रंगणाऱ्या विवाहसोहळ्यात अापली मैत्रीण पंखुरी शर्मा हिच्यासोबत लगीनगाठ बांधणार अाहे.


मुंबईत बुधवारी रंगणार विवाहसोहळा

मुंबई इंडियन्सच्या कृणाल पंड्याने ट्विटरद्वारे अापल्या लग्नाची घोषणा केली असून पंखुरीसोबतचे अनेक फोटो त्याने शेअर केले अाहेत. बुधवारी मुंबईत रंगणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी कुटुंबिय, मित्रमंडळींसोबत दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार अाहेत. एका नात्याची सुरेख सुरुवात करण्यासाठी अाणि पंखुरीसोबत माझं उर्वरित अायुष्य व्यतित करण्यासाठी मी उत्सुक अाहे. विलक्षण अाभारी अाहे, असं ट्विट कृणालनं केलं अाहे.




अानंदाची सुरुवात -हार्दिक

कृणालच्या लग्नासाठी त्याचा लहान भाऊ हार्दिक हासुद्धा उत्सुक अाहे. 'कृणालची विकेट पंखुरीनं काढली अाहे. माझी जान लग्नबंधनात अडकणार असून या लग्नासाठी मी खूपच उत्सुक आहे. अाता अानंदाची सुरुवात होणार अाहे. बोल्ड अोव्हर ब्युटी', अशा शब्दांत हार्दिकनं अापल्या भावना व्यक्त केल्या अाहेत.




कृणालला भारतीय अ संघात संधी

एकीकडे हार्दिक पंड्या भारतीय संघातून खेळताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत अाहे. तर कृणालला भारतीय संघातील दारं अद्याप खुली झालेली नाहीत. अायपीएल २०१७ च्या अंतिम फेरीत कृणालच्या अप्रतिम खेळीमुळे मुंबई इंडियन्सला एका धावेच्या फरकाने अायपीएलच्या जेतेपदाला गवसणी घालता अाली. कृणालला अंतिम लढतीत 'मॅन अाॅफ द मॅच' पुरस्कार देण्यात अाला. या वर्षी कृणालला दक्षिण अाफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अ संघातही संधी मिळाली होती.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा