Advertisement

मुंबई इंडियन्स अायपीएलसाठी सज्ज, चेन्नई सुपर किंग्सशी सलामीचा सामना


मुंबई इंडियन्स अायपीएलसाठी सज्ज, चेन्नई सुपर किंग्सशी सलामीचा सामना
SHARES

'ये खेल हे शेर जवानों का' अशा टॅगलाइननुसार अायपीएलच्या ११व्या पर्वाला सुरुवात होणार अाहे. गतविजेता मुंबई इंडियन्स अायपीएलमध्ये जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला अाहे. अायपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्स अाणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये होणाऱ्या उद्घाटनाच्या सामन्याद्वारे अायपीएलचं बिगुल वाजणार अाहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमींमध्ये अायपीएलची उत्सुकता शिगेला पोहोचली अाहे.


दोन वर्षांनंतर चेन्नईचं पुनरागमन

मॅचफिक्सिंगच्या अारोपांमुळे चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात अाली होती. अाता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स दोन वर्षांनंतर पुन्हा अायपीएलमध्ये परतला अाहे.

मुंबईची तगडी फलंदाजी

कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, इर्विन लुइस, इशान किशन, कृणाल पंड्या, किराॅन पोलार्ड, मुस्तफिझुर रहमान यांच्यामुळे मुंबईची फलंदाजी तगडी बनली अाहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्ट इंडिजच्या इर्विन लुइसने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या. जसप्रीत बुमरा, मिचेल मॅकक्लेनाघन, पॅट कमिन्ससारखे भन्नाट गोलंदाजही अाहेत.


तोडीस तोड चेन्नई संघ

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघात सुरेश रैनाचे पुनरागमन झाले असून फॅफ डू प्लेसी, ड्वेन ब्राव्हो, शेन वाॅटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा असे भक्कम फलंदाज त्यांच्याकडे अाहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत हरभजन सिंग, इम्रान ताहीर, लुंगी निगडी, कर्ण शर्मा यांच्यासारखे अप्रतिम गोलंदाज अाहेत.


अामने-सामने

अातापर्यंत मुंबई अाणि चेन्नई यांच्यात २२ सामने झाले असून मुंबई इंडियन्सने १२ सामन्यांत बाजी मारली अाहे. वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ सात वेळा भिडले असून मुंबईने पाच सामन्यांत अधिराज्य गाजवले अाहे.


सामना : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा