Advertisement

मुंबईचा पहिला विजय, कोलकातावर दणदणीत मात


मुंबईचा पहिला विजय, कोलकातावर दणदणीत मात
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा दणदणीत विजय झाला आहे.

कर्णधार ईऑन मॉर्गनच्या अचूक रणनितीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला २० षटकात १५२ धावांवर सर्वबाद केले. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सुरुवातीला फिरकीपटू आणि डावाच्या शेवटी आंद्रे रसेलला गोलंदाजी देत मॉर्गनने मुंबईच्या फलंदाजांवर पूर्ण नियंत्रण साधले. रसेलने १८व्या षटकात गोलंदाजीला येत २ षटकात १५ धावा देत ५ बळी घेतले.

मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला संधीचे सोने करता आले नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळले. त्याने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ४२ धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा धारण करत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान त्याने रोहितसोबत ३३ चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर मुंबईला आपली धावगती वाढवता आली नाही. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक ४३ धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बोल्ड केले.

सूर्यकुमार-रोहितच्या विकेटनंतर कोलकाताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. १८व्या षटकात मॉर्गनने अष्टपलू खेळाडू आंद्रे रसेलच्या हातात चेंडू सोपवला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. रसेलव्यतिरिक्त पॅट कमिन्सने २ बळी घेतले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा