Advertisement

रोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय

रोहित शर्माची धडाकेबाज ८० धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांना केकेआरवर आज विजय साकारता आला.

रोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं दमदार विजय मिळवला आहे. रोहित शर्माची धडाकेबाज ८० धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांना केकेआरवर आज विजय साकारता आला.

मुंबई इंडियन्ससाठी आजचा विजय अविस्मरणीय असाच असेल. कारण हा त्यांचा या स्पर्धेतील पहिला विजय तर ठरलाच, पण युएईमधीलही त्यांचा हा पहिलायच विजय आहे. युएईमधील गेल्या सहा सामन्यांमध्ये मुंबईला एकही विजय मिळवता आला नव्हता. या विजयासह मुंबईने स्पर्धेतील आपले खाते उघडले आहे. रोहित शर्माची धडाकेबाज ८० धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांना केकेआरवर विजय मिळवता आला आहे.

प्रथम फलंदाजी करत मुंबईनं केकेआरसमोर १९६ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला शुभमन गिलच्या रुपात पहिलाच धक्का लवकर बसला. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुनील नरिनही झटपट बाद झाला. त्यामुळे कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी आपल्या खेळीला सावधपणे सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली असून, दिनेश कार्तिकला यावेळी ३० धावा करता आल्या, तर राणाने २४ धावा केल्या.

केकेआरने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचा निर्णय केले. यावेळी केकेआरचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने संघाला दुसऱ्या षटकात पहिले यश मिळवून दिले. मवीनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर क्विंटन डिकॉकला बाद केलं. डीकॉक बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी केली. रोहित आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच मुंबईला आपल्या धावसंख्येचा चांगला पाया रचला आहे.

सूर्यकुमार धावचीत झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारने २८ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४७ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार बाद झाला असला तरी रोहित मात्र चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे रोहितने यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आण अर्धशतकही झळकावले. रोहितने यावेळी ५४ चेडूंत चीन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८० धावांची खेळी साकारली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा