Advertisement

मराठमोळ्या दिग्वीजय देशमुखला झहीर खानचं मराठीतून प्रशिक्षण


मराठमोळ्या दिग्वीजय देशमुखला झहीर खानचं मराठीतून प्रशिक्षण
SHARES

आयपीएलच्या तेराव्या हंगामा युएईत सुरु असून, प्रत्येक सामन्यानंतर मुंबईचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये मुंबईला २ पराभव आणि १ विजय मिळाला आहे. यंदा मुंबई इंडियन्सनं आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. त्यानुसार, मुंबईनं बीडच्या दिग्वीजय देशमुखला आपल्या संघात स्थान दिलं आहे. २० लाखांची बोली लावत मुंबईने दिग्वीजयवर  लावली होती.

या आयपीएलमध्ये दिग्वीजय देशमुखला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही, मात्र तो तज्ज्ञ गोलंदाजीचा कसून सराव करत आहे. मुंबई इंडियन्सचा झहीर खाननं युएईत सरावादरम्यान दिग्वीजयशी मराठीत बोलून त्याला गोलंदाजीच्या काही टिप्स दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

झहीर खान हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा रहिवासी आहे. त्यामुळे झहीर खानचं मराठी हे उत्तम आहे. नेट्समध्ये दिग्वीजय करत असलेली गोलंदाजी पाहून त्याच्यात सुधारणा होत असल्याची पावतीही झहीरने मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडला दिली.

झहीर खाननं मराठीतून दिलेल्या या मराठी परिक्षणाचा  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा