Advertisement

रणजी स्पर्धेत मुंबईची आघाडी


रणजी स्पर्धेत मुंबईची आघाडी
SHARES

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने तिसऱ्या दिवसाअखेर 307 धावांची आघाडी घेत आपला दबदबा कायम राखला. हा सामना आंध्र प्रदेश येथील सीएसआर शर्मा कॉलेज मैदानावर खेळवण्यात आला.


मुंबईची चमकदार कामगिरी

श्रेयस अय्यरच्या अर्ध शतकी खेळी याचबरोबर गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णीच्या शानदार कामगिरीमुळे मुंबई संघाला 117 धवांवर मजल मारण्यात यश मिळाले. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 332 धावा केल्या, तर त्यानंतर आंध्रप्रदेश संघाला 215 धावांमध्ये ढेर करत मुंबईने 117 धावांची आघाडी घेत 3 गुण आपल्या खिशात घातले. आंध्र प्रदेशच्या हनुमा विहारी याला 70 आणि रिकी भुई याला 69 धावा करण्यात यश मिळाले.


शार्दूलची आक्रमक गोलंदाजी

शार्दूलने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर आंध्रप्रदेशच्या अर्ध्या फलंदाजांना 55 धावांमध्ये बाद करत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. याचसोबत धवलने देखील 44 धावांत 3 बळी घेतले.

दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ 21 धावा करत आणि जय बिस्त 36 वर बाद झाल्यामुळे मुंबईला चांगलाच धक्का बसला. पण यानंतर श्रेयस अय्यरने 75 धावा केले तर सुर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. आंध्र प्रदेशच्या अय्यप्पा बंदारूच्या धुंवादार गोलंदाजीमुळे सुर्यकुमारला तंबूत माघारी परतावे लागले. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी खेळ थांबला तेव्हा कर्णधार आदीत्य तरे आणि श्रेयस अय्यरही जोडी खेळत होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा