Advertisement

मुंबईचा रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश


मुंबईचा रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
SHARES

रणजी स्पर्धेत त्रिपुरा विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत मुंबई संघाने १० विकेट्सने विजय मिळवला. यावेळी बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई संघाने चांगलीच झुंज दिली. पण तिसऱ्या दिवशी अखेर त्रिपुराचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबई संघाने हा सामना जिंकत २१ गुण मिळवून अव्वल स्थान देखील पटकावले आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला.


मुंबईने त्रिपुराला २८८ धावांत गुंडाळले

या सामन्यात तिसऱ्या दिवशी मुंबई संघाला विजय मिळवण्यासाठी त्रिपुराकडून ६३ धवांचे आव्हान देण्यात आले होते. यामध्ये मुंबईच्या पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी करत २६ चेंडूत ८ चौकारासह नाबाद अर्धशतक खेळी करत मुंबईला विजयी करण्यात मोलाची कामगिरी केली. या निर्णायक सामन्यात पृथ्वी शॉच्या कामगिरीने मुंबईने उपांत्यफेरी गाठली. सोमवारी सकाळी सुरुवातीलाच मुंबईने पहिल्या डावात ८ बाद ४२१ धावांचा डोंगर रचत त्रिपुरावर २२६ धावांची आघाडी घेतली. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या त्रिपुराचा अर्धा संघ पहिल्या डावात ढेर झाला. मुंबईच्या गोलंदाजीसमोर त्यांना फार काळ टिकता आले नाही. यावेळी युवा गोलंदाज आकाश पारकरने ४३ धावांत १ बाळी घेतला, तर धवल कुलकर्णीने ४/६० आणि कर्ष कोठारीने ७२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत त्रिपुराला २८८ धावांत गुंडाळत मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा