Advertisement

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाकडून नोटीस

विराटसह प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाकडून नोटीस
SHARES

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मालिकेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. पण त्यापूर्वीच कोहलीला मोठा धक्का बसला आहे. केरळ उच्च न्यायालयाने विराट कोहलीला नोटीस बजावली आहे. विराटसह प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

ऑनलाईन रमीवर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देताना केरळ उच्च न्यायालयाने विराट कोहलीला नोटीस बजावली. विराट कोहली, तमन्ना भाटिया आणि अजू वर्गीस हे ऑनलाईन रमी गेम्सचे ब्रँड अँबेसेडर आहेत. या गेमचे व्यसन तरुण पिढीला लागलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळे या गेमविरोधात आणि त्याचे प्रमोशन करणाऱ्या व्यक्तींविरोधात केरळ उच्च न्यायालयात पाऊली वडक्कन यांनी याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली आहे. विराट कोहलीसह अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता अजू वर्गीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. न्यायालयाकडून या सर्वांव्यतिरिक्त केरळ राज्य सरकारकडूनही यासंबंधी स्पष्टीकरण मागवलं आहे.

याचिकाकर्ते पाऊली वडक्कन यांनी म्हटलं की, राज्यात ऑनलाईन जुगाराचा धोका वाढत चालला आहे. या जुगाराच्या जाळ्यात मध्यम व निम्न वर्गातील जनता सापडते. विराट कोहली, तमन्ना भाटिया यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती खोट्या वचनांद्वारे जनतेला रमीकडे आकर्षित करतात पण प्रत्यक्षात त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैसे जिंकण्याची शक्यता कमी असते. काही जणांचा यामुळे जीवही गेला आहे. २७ वर्षीय विनित या युवकाने या गेमममध्ये तब्बल २१ लाख रुपये गमावले, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. 

मी स्वतःदेखील या गेमच्या व्यसनामुळे ६ लाख रुपये गमावले. इतरही अनेक लोकांना यामुळे भरपूर नुकसान होत आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमवरही बंदी घालणे आवश्यक आहे, असं वडक्कन यांनी म्हटलं. 



हेही वाचा -

ODI Ranking: विराट कोहली अव्वल स्थानी कायम

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा