Advertisement

शांततेसाठी क्रिकेट स्पर्धा


SHARES

साकीनाका - वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालता यावा आणि तरुणाईला शांततेच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी साकिनाका येथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. हे क्रिकेट सामने 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान पार पडणार आहेत. क्रिकेट स्पर्धेत केवळ 10-12संघांचा सहभाग नाही तर साकिनाका परिसरातील चक्क 50 संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे आय.ए.एस माजी प्रमुख चिटणिस जॉनी जोसेफ आणि ए. सी. पी संजय पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद् घाटन गुरुवारी सकाळी झालं. चक्क पोलिसांनी देखिल हातात चेंडूफळी घेवून तरुणांना शांततेचं आवाहन केलं. या 50 संघातून उत्कृष्ठ असे 12 खेळाडूंची निवड केल्यानंतर त्यांना साकिनाका पोलिसांच्या वतीने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल. या उपक्रमामुळे तरुण युवक हे पोलिसांच्या सानिध्यात राहतील. त्यामुळे गुन्हे कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा साकिनाका पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली . तर अविनाश धर्माधिकारींसारखे पोलीस निरीक्षक सर्वच पोलीस स्थानकाला लाभो असं वक्तव्य मोहल्ला कमिटीच्या सुनंदा सागर यांनी केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement