Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

पंजाबचा मुंबईवर विजय, राहुल-गेलची दमदार भागीदारी

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबनं विजय मिळवला आहे.

पंजाबचा मुंबईवर विजय, राहुल-गेलची दमदार भागीदारी
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबनं विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईनं चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं अर्धशतकी खेळी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकनं दीपक हुडाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, मोझेस हेन्रिक्सनं त्याचा झेल टिपला. कॉकला ३ धावा करता आल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने १ बाद २१ धावा केल्या. डि कॉक बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी ईशान किशन मैदानात आला. मात्र, मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले.

पंजाबचा नवा फिरकीपटू रवी बिश्नोईनं किशनला यष्टीपाठी झेलबाद केलं. ईशान किशनला १७ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित-सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. १४व्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं आपले अर्धशतक पूर्ण केलं.

रवी बिश्नोईनं पंजाबला १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बसला.

सूर्यकुमारनं ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. पुढच्याच षटकात मुंबईने रोहितला गमावले. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. या दोघांनंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि बिश्नोईने प्रत्येकी २ बळी घेतले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा