Advertisement

पृथ्वीची ५ वी सेंच्युरी, सचिनचा रेकाॅर्ड मोडताना थोडक्यात हुकला


पृथ्वीची ५ वी सेंच्युरी, सचिनचा रेकाॅर्ड मोडताना थोडक्यात हुकला
SHARES

जबरदस्त टॅलेंट असलेला पृथ्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडणार असं सगळ्यांना वाटत असताना पृथ्वीचा वयानं घात केला अन् सचिनचा रेकाॅर्ड तुटताना थोडक्यात राहिला.


७ मॅचमधील ५ वी सेंच्युरी

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फाॅर्म कायम ठेवत मुंबईकर ओपनर पृथ्वी शाॅने शुक्रवारी रणजी ट्राॅफीतील आंध्र प्रदेशविरूद्धच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा खणखणीत सेंच्युरी ठोकली. पृथ्वीची मागच्या ७ मॅचमधील ही ५ वी सेंच्युरी आहे.

१८ वर्षांच्या पृथ्वीने आंध्र प्रदेशच्या बाॅलर्सचा समाचार घेत ६५.९० च्या स्ट्राईक रेटने ११७ बॅलमध्ये ११४ रन्स केले. यांत १ सिक्स आणि १४ बाऊंड्रीजचा समावेश आहे.

या अगोदर पृथ्वीने ओडिशा विरूद्धच्या रणजी मॅचमध्ये सेंच्युरी झळकावत १५३ रन्स केल्या होत्या.



कसं चुकलं गणित?

१८ वर्षे पूर्ण होण्याआधी विक्रमी शतक ठोकण्याच्या बाबतीत पृथ्वीच्या पुढे फक्त एकच खेळाडू आहे, तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनच्या नावावर सर्वाधिक ७ सेंच्युरीची नोंद आहे. तर पृथ्वीने नुकतीच ५ वी सेंच्युरी केली. दुर्दैवाची बाब म्हणजे ९ नोव्हेंबरला पृथ्वी १८ वर्षांचा झाल्याने सचिनचा विक्रम मोडण्याची त्याची इच्छा अर्धवटच राहिली.


पहिल्यांदा लाईमलाईटमध्ये

नोव्हेंबर २०१३ मध्ये हॅरीस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्डसाठी खेळताना ३३० बाॅल्सवर ५४६ रन्स करून पृथ्वी सर्वात पहिल्यांदा लाईमलाईटमध्ये आला होता. पृथ्वीच्या या स्कोअरची क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम स्कोअर म्हणून नोंद झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा