Advertisement

गुरुवारच्या रणजी मॅचवर 'ग्रहण'

मुंबई विरुद्ध रेल्वे यांच्यात गुरुवारी रणजी ट्रॉफीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ सूर्यग्रहणामुळे दोन तास उशिरानं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण वाचून व्हाल चकित...

गुरुवारच्या रणजी मॅचवर 'ग्रहण'
SHARES

२०१९ या वर्षातील शेवटच्या सुर्यग्रहणाचा फटका क्रिकेटला बसणार आहे. मुंबई विरुद्ध रेल्वे यांच्यात गुरुवारी रणजी ट्रॉफीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ सूर्यग्रहणामुळे दोन तास उशिरानं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण शेवटचं सुर्यग्रहण गुरुवारी म्हणजेच २६ डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ११ या दरम्यान होणार आहे. रणजीच्या मॅचेच सकाळी ९.३० वाजता सुरू होतात. पण गुरुवारी मुंबई आणि राजकोट इथल्या रणजी मॅच दोन तास उशीरानं सुरू होणार आहेत.

रणजी ट्रॉफीचे सर्व सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सकाळी साडे नऊ वाजेपासून सुरू होतात. परंतु, गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ ११.३० वाजता सुरू होणार आहे. रेल्वेनं ४१ वेळा रणजी चॅम्पियन मुंबईला ११४ धावावर बाद करून दोन धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईची संघ पहिल्या दिवशी ११४ धावावर बाद झाला असून रेल्वेनं आतापर्यंत ५ गड्यांच्या बदल्यात ११६ धावा केल्या आहेत.

सौराष्ट्र क्रिकेट संघानं सुद्धा गुरुवारचा राजकोटमधील दुसऱ्या दिवशीचा खेळ साडे ११ वाजता सुरू होणार असल्याचं म्हटलं आहे. हा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात होणार आहे. हा सामना उशिरानं सुरू होण्यासही सूर्यग्रहण कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

सूर्यग्रहणाची सुरूवात सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांनी होणार आहे. तर दुपारी १ वाजून ३५ मिनिटांवर सूर्यग्रहण संपणार आहे. १० वाजून ४७ मिनिटांवर सूर्यग्रहण मध्यभागी असेल त्यामुळे जवळपास साडे तीन मिनिट सूर्यग्रहण असणार आहे



हेही वाचा

मुंबईकर शार्दुलची विराट रोहलीनं मराठीतून केली स्तुती

विक्रमी रो'हिट'मॅन शर्मा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा