Advertisement

विक्रमी रो'हिट'मॅन शर्मा


विक्रमी रो'हिट'मॅन शर्मा
SHARES

भारताचा सलामीवीर फलंदाज 'हिटमॅन' रोहित शर्मा यानं यंदाच्या वर्षात सर्वच गोलंदाजांची चौफेर धुलाई केली आहे. या चौफेर धुलाईसोबत रोहित शर्मानं विक्रमाच्या शर्यतीमधील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. दरवर्षी क्रिकेटविश्वात भारतीय खेळाडूंसह अन्य खेळाडूंची विक्रमी खेळी पाहायला मिळते. परंतु, २०१९ या वर्षात धावांच्या शर्यतीपासून सर्वाधिक षटकार यांसह अन्य विक्रमाच्या यादीत रोहित शर्मानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळं २०१९ हे वर्ष रोहित शर्मासाठी 'विक्रमी वर्ष' ठरलं असं म्हणणं वावग ठरणार नाही.

२०१९ या वर्षात भारतीय क्रिकेट संघानं एकूण ७ दौरे केले. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी केली. परंतु, उर्वरित २ सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर न्यूझिलंड दौऱ्यादरम्यानही रोहितला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यामधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितनं ८७ धावा तर, दुसऱ्या टी-२० मध्ये अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिज दौऱ्यावरही रोहितनं चांगली फलंदाजी केली नाही. यासोबतच मायदेशी झालेल्या सामन्यात रोहितनं चांगली कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.


एका वर्षात १५० पेक्षा अधिक धावा करण्याच्या यादीतही रोहित शर्मानंच बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षात रोहित शर्मानं १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितनंतर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नचा नंबर येत असून ६ वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

एका वर्षात ७ शतक ठोकण्याचा मानकरी रोहित शर्माचं ठरला आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं २००० साली व ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर यानं २०१६ साली प्रत्येकी ७ शतक ठोकली होती. मात्र, एका वर्षात सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिननं १९९८ साली ९ शतकं ठोकली होती.

वर्षातील शतकं :

  • ऑस्ट्रेलिया वि. १३३
  • साऊथ आफ्रिका वि. १२२
  • पाकिस्तान वि. १४०
  • इंग्लंड वि. १०२
  • बांग्लादेश वि. १०४
  • श्रीलंका वि. १०३
  • वेस्ट इंडिज वि. १५९

भारताचा सलामीवीर म्हणून आतापर्यंत रोहित शर्मानं संघाला चांगली सुरवात करून दिली आहे. अगदी वर्ल्डकपमध्ये ही त्यानं आपला दरारा कायम ठेवला होता. प्रत्येक सामन्या अर्धशतकी व शतकी खेळी करत त्यानं गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

वर्ल्डकपमधील खेळी

संघधावाचेंडूषटकारचौकार
साऊथ आफ्रिका१२२१४४१३
ऑस्ट्रेलिया५७७०
पाकिस्तान१४०११३१४
अफगाणिस्तान१०
वेस्ट इंडिज१८२३
इंग्लंड१०२१०९१५
बांग्लादेश१०४९२
श्रीलंका१०३९४१४
न्यूझिलंड


सर्वाधिक धावाप्रमाणं रोहित शर्मा मागील ३ वर्ष सतत षटकारांचा वर्षाव करतो आहे. मैदानाच्या चहुबाजूंना षटकार मारत २०१७ ते २०१९ या वर्षात रोहित एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरत आला आहे. आतापर्यंत रोहितच्या खात्यात ७५ षटकार जमा झाले असून, विंडीजविरुद्धचा एक वन-डे सामना बाकी आहे. त्यामुळं षटकरांची ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रोहित शर्मानं मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करत धोनी आणि विराटला मागे टाकलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता अव्वल स्थानी पोहचला आहे.

सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज

  • रोहित शर्मा – २९*
  • महेंद्रसिंह धोनी – २८
  • विराट कोहली – २५

रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात १३८ चेंडूत १५९ धावा केल्या. या खेळीत त्यानं तब्बल १७ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळं त्यानं यंदाच्या वर्षात १४०० धावांचा टप्पा पार केला. रोहितनं १४२७ धावा करत २०१९ या एकाच वर्षात (जानेवारी ते डिसेंबर) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. तसंच, त्यानं भारतीय संघाचा कर्णधार व 'रनमशीन' विराट कोहली याला मागं टाकलं. विराटच्या २०१९ या वर्षात १२९२ धावा आहेत.

रोहितनं झळकावलेल्या शतकासह त्यानं विराट कोहलीला शतकांच्या शर्यतीत मागे टाकले. २०१७ या वर्षाच्या सुरूवातीपासून ते डिसेंबर २०१९ या कालावधीतील रोहितचं हे १८ वं शतक ठरलं. भारताकडून या दोन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावे होता. त्याने १७ एकदिवसीय शतके झळकावली होती. पण वेस्ट इंडीजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले आणि १८ वे शतक लगावलं.

वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितनं १४० धावांवर असताना दमदार षटकार ठोकला. त्यामुळं त्यानं त्याची वैयक्तिक धावसंख्या १४६ वर पोहोचली. या षटकारासोबत सलग सातव्या वर्षी भारताकडून सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या करण्याचा विक्रम कायम राखला. रोहित २०१३ पासून ते २०१८ पर्यंत सलग सहा वर्षे भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करणारा ठरला होता. यंदाच्या वर्षी शिखर धवन हा १४३ धावांसह सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज होता. मात्र, धवनला मागे टाकत आपला नाव या विक्रमावर नोंदवलं आहे.

रोहित शर्मानं २००७ साली आर्यलॅंड विरुद्ध झालेल्या सामन्यातून भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यावेळी २००७ या वर्षात रोहित शर्मानं ३ सामन्यात ६१ धावा केल्या. त्यामुळं सुरूवातीला रोहितला चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु, २००८ वर्षापासून रोहितच्या धावसंख्येत वाढ झाली. यावर्षी रोहितनं ५३३ धाव केल्या होत्या. परंतु, पुन्हा त्याच्या धावसंख्येत घसरण झाली. मात्र, त्यानंतर आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करत २०१३ साली धावसंख्या ११९६ वर नेली. त्यानंतर, २०१७ मध्ये १२९३, २०१८ मध्ये १०३० आणि २०१९ मध्ये १४२७ धावा करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अनुभवी रोहित

भारतीय क्रिकेट संघाचं उपकर्णधार पद रोहित शर्माकडं आहे. काही सामन्यांमध्ये तर आपण त्याला संघाच्या कर्णधार पदीही पाहिलं आहे. संघाचं नेतृत्व करत असताना रोहितचा खेळ खुलतो. तसंच, त्यावेळी विरुद्ध संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतो. त्यामुळं बहुतांश क्रिकेटप्रेमी भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीपेक्षा रोहित शर्माला पाहतात. गेल्या काही वर्षांमधध्ये भारतीय संघाच्या एकामागोमाग एक होत असलेल्या दौऱ्यांमुळे विराट कोहलीवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळं वन-डे व टी-२० संघाची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर टाकल्यास विराट आणखी चांगली खेळी करू शकेल, असं मत व्यक्त करत आहेत.

मागील काही सामन्यांमध्ये रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. पण त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितला कर्णधारपद भूषवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. मात्र, आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्व आपण पाहिलं आहे. मुंबई इंडियन्स या आपल्या संघाला रोहितनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१८ या ४ वर्षांमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्या तरीही रोहितच्या पदरात आता चांगलाच अनुभव आहे. त्यामुळं भारतीय संघान त्याच्या या अनुभवाचा फायदा घेतलाच पाहिजे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने सक्षमपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं. कर्णधार म्हणून विराट कोहली संघात अनेक बदल करतो. त्यामुळं अनेकदा त्याच्यावर टीकाही करण्यात आल्या आहेत. मात्र, रोहित शर्मा हा आपल्या सहकारी खेळाडूंवर विश्वास ठेऊन त्यांना एक संधी देतो. अनेकदा प्रत्यक्ष सामन्यादरम्यान गरजेनुसार संघाची रणनिती बदलणं ही रोहितच्या कर्णधारपदाची सकारात्मक बाजू ठरली आहे. त्यामुळं भविष्यात वन-डे व टी-२० संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती दिल्यास भारतीय संघाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.


हेही वाचा -

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला?

इंटरनेट सेवा बंद करण्यात भारत अव्वल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा