Advertisement

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला?

नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं म्हटलं जात होतं. त्यानुसार ठाकरे सरकारचा ​पहिला मंत्रिमंडळ विस्तार​​​ येत्या मंगळवारी २४ डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला?
SHARES

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार येत्या मंगळवारी २४ डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं म्हटलं जात होतं. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्र्यांचे शपथविधी मुंबईत होतील.

या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण २९ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. त्यात शिवसेनेच्या १०, राष्ट्रवादीच्या ११ तर काँग्रेसच्या ८ मंत्र्यांचा समावेश असेल. पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्वच्या सर्व मंत्री शपथ घेतील असं सध्या तरी दिसून येत नाही. 

हेही वाचा- ‘तेव्हाच’ होईल मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांचा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून प्रत्येकी २ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर १५ दिवसांनी या मंत्र्यांना तात्पुरत्या स्वरूपात मंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं.

मंत्रीपदांच्या वापटपानुसार एकूण ४२ मंत्रीपदांपैकी शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह १५, राष्ट्रवादीला १६ आणि काँग्रेसला १२ मंत्रीपद देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी ३९ मंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर उरलेली मंत्रीपदं राखून ठेवण्यात येतील. 

हेही वाचा- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडी?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा