Advertisement

‘तेव्हाच’ होईल मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांचा खुलासा

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांपैकी कुणीच खात्रीलायक माहिती दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा गोंधळ कायम आहे.

‘तेव्हाच’ होईल मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांचा खुलासा
SHARES

नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं म्हटलं जात आहे. परंतु हा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याबाबत खात्रीलायक माहिती मिळत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा- बेळगावातील मराठी माणूस हिंदू नाही का? निघाले देशाबाहेरील हिंदूंना न्याय द्यायला- ठाकरे

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर रोजी संपत आहे. या अधिवेशनानंतर २३ किंवा २४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं म्हटलं जात आहे. परंतु या तारखेवर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांपैकी कुणीच खात्रीलायक माहिती दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा गोंधळ कायम आहे.

त्यावर अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होत आहे. या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे सहभागी होतील की नाही, माहीत नाही. परंतु अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सुटी आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी संमती दिली, तरच २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.  

हेही वाचा- खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा