Advertisement

खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उत

भाजपचे ज्येष्ठ नेते ​एकनाथ खडसे​​​ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी नागपूरमध्ये भेट घेतल्याने खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उत
SHARES

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी नागपूरमध्ये भेट घेतल्याने खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खुद्द खडसेंनी मात्र या बातमीला कुठल्याही प्रकारे दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा- गोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत

नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार मंगळवारी नागपूरमध्ये आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. याच दरम्यान एकनाथ खडसे देखील नागपूरमध्ये असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले असता, तेथेही पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उत आला. 

त्यावर प्रतिक्रिया देताना, खडसे नाराज असल्याचं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. खडसेंनी गेली ४० वर्ष पक्षाच्या वाढीचं काम केलं यात कोणाचंही दूमत नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्त्वात काम केलंय. त्यामुळे त्यांची नाराजी दूर केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचं काम पक्ष नक्की करेल ', असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

हेही वाचा- पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन

परळीतील गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात खडसे यांनी पक्षातील नेतृत्वाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. शिवाय रोहिणी खडसे यांच्या पराभवाला जबाबदार असलेल्या भाजप नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही दाद मिळत नसल्याने खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा