Advertisement

गोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत

गोपीनाथ मुंडे जर आज असते, तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता, अशी भावना भाजपचे नाराज नेते ​एकनाथ खडसे​​​ यांनी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत
SHARES

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे जर असते, तर… अशा चर्चा सध्या होत आहेत. ते जर आज असते, तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता, अशी भावना भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील गोपीनाथ गड इथं मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

 हेही वाचा- पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन

ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालीच, शिवाय भाजपचीही मोठी हानी झाली. गोपीनाथ मुंडे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. ते असते तर कदाचीत भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. कारण त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांची भूमिका नेहमी समन्वयाची असायची. त्यामुळे सध्यापेक्षा भाजपची अवस्था निश्चित चांगली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही खडसे यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा