Advertisement

पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन

पक्षविरोधी काम करणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराज नेते एकनाथ खडसे यांना दिल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं.

पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन
SHARES

पक्षविरोधी काम करणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराज नेते एकनाथ खडसे यांना दिल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं.

एकनाथ खडसे यांनी मंगळवारी आधी पंकजा मुंडे आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर सुरू झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत खडसे यांची नाराजी कशी दूर करायची यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसेंच्या आरोपांबद्दल विचारलं असता, त्यांना त्याला दुजोरा दिला.

हेही वाचा- 'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीका

ते म्हणाले, एकनाथ खडसे यांनी दिलेले सर्व पुरावे आणि तथ्य आम्ही सर्वात पहिल्यांदा तपासू. त्यानंतर कुठल्या पदाधिकारी वा नेत्याने पक्षविरोधी काम केलं असल्यास त्यांच्यावर नक्की कारवाई करून, असं आश्वासन आम्ही एकनाथ खडसे यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे पराभूत होण्यामागे पक्षातील पदाधिकाऱ्यांचाच हात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. शिवाय यासंदर्भातील सर्व पुरावे, आॅडियो क्लिप आणि फेसबुक वाॅल इ. पुरावे पक्षातील वरिष्ठांना दिले असून त्यावर काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असल्याचं खडसे म्हणाले होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा