SHARE

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत आपले जुने संबंध असून त्यांची लवकरच भेट घेऊ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंची भेट घेण्याचे संकेत दिले.

नाराज खडसे यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश न आल्याने त्यांनी दिल्लीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हेही वाचा- पाठिंबा द्यायचा की नाही? नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून शिवसेना गोंधळात

यासंदर्भात ठाकरे यांना विचारलं असता, नाथाभाऊंचे आणि आमचे सहकारी आहेत. त्यांच्याशी आमचे राजकारणापलिकडचेा संबंध आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी नक्कीच चर्चा करू, असं ते म्हणाले. 

दरम्यानच्या काळात खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत २ तास चर्चा केली. ही चर्चा गोपीनाथगडावर १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी होती, अशी माहिती त्यांनी दिली. परंतु भाजपचे वरिष्ठ नेतेही दाद देत नसल्याने खडसे लवकरच पक्षांतराचा मार्ग निवडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.     

संबंधित विषय
ताज्या बातम्या