Advertisement

बेळगावातील मराठी माणूस हिंदू नाही का? निघाले देशाबाहेरील हिंदूंना न्याय द्यायला- ठाकरे

भाजपचं गाय आणि हिंदुस्थानबाबतचं मत बेगडी असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

बेळगावातील मराठी माणूस हिंदू नाही का? निघाले देशाबाहेरील हिंदूंना न्याय द्यायला- ठाकरे
SHARES
Advertisement

आम्हाला सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान हवा आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा, असं म्हणत भाजपचं गाय आणि हिंदुस्थानबाबतचं मत बेगडी असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. भाजप जर सावरकरांना मानते तर बेळगावातील मराठी माणसांचा आकोश भाजपला दिसत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  

हेही वाचा- गरीबांना बुलेट ट्रेन नाही, तर रिक्षाच परवडते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

बेळगाव, कारवार भागातील मराठी बांधवांवर आजही अन्याय होत आहे. बेळगाव, कारवारमध्ये राहणारे मराठी नागरिक हे हिंदू नाहीत का? बाहेरील देशातील हिंदूना न्याय देण्यासाठी केंद्र सरकार निघाले आहे. कर्नाटकमधील सरकारही हिंदूंचं सरकार आहे मग बेळगावमधील मराठी माणसांवर अन्याय का?

जसं पाकव्याप्त काश्मीर आहे. तसंच बेळगाव हे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात आहे. कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणण्याची गरज असून कोर्टात याप्रकरणी केंद्र सरकाने कर्नाटकची बाजू घेतली.  

हेही वाचा- सावरकरांचे गायींबद्दलचे विचार तुम्हाला मान्य आहेत का? ठाकरेंचा भाजपला थेट प्रश्न

संबंधित विषय
Advertisement